Maharashtra Pradeshik Vibhag Kiti v Konte । महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग म्हणजे काय? ३६ जिल्ह्याचे विभाजन किती प्रादेशिक विभागात होते? informerguru Blog या ब्लॉग आज जाणून घेऊया.
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग म्हणजे काय ?
महाराष्ट्राची ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये विभागणी केली याला महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग असे म्हणतात.
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती व कोणते आहेत?
महाराष्ट्राचे एकूण प्रादेशिक विभाग पाच आहेत आणि ते पुढील प्रमाणे आहेत:-
1) विदर्भ
- विदर्भ हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील पहिला प्रादेशिक विभाग आहे या मध्ये २ प्रशासकीय विभाग येतात नागपूर विभाग आणि अमरावती विभाग.
- महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण ६ जिल्हे येतात ते म्हणजे नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली होय.
- महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण ५ जिल्हे येतात ते म्हणजे अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम होय.
- महाराष्ट्राच्या विदर्भ या प्रादेशिक विभागामध्ये एकूण 11 जिल्हे येतात. (6 जिल्हे नागपूर विभागात आणि 5 जिल्हे अमरावती विभागात येतात.)
2) मराठवाडा
- मराठवाडा हे महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील दुसरा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे औरंगाबाद विभाग.
- महाराष्ट्राच्या मराठवाडा या प्रादेशिक विभागामधील औरंगाबाद या प्रशासकीय विभागात एकूण ८ जिल्हे येतात ते औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी होय.
3) खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग
- खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील तिसरा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे नाशिक विभाग.
- खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र या महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागातील नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण ५ जिल्हे येतात ती पुढील प्रमाणे आहे : नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर.
4) कोकण
- कोकण हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील चौथा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे कोकण विभाग.
- कोकण या महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागामधील कोकण या प्रशासकीय विभागात एकूण ७ जिल्हे पुढील प्रमाणे येतात : मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
5) पश्चिम महाराष्ट्र
- कोकण हा महाराष्ट्राचे प्रादेशिक विभागमधील पाचवा प्रादेशिक विभाग आहे या मध्ये १ प्रशासकीय विभाग येतो तो म्हणजे पुणे विभाग.
- पुणे विभाग या महाराष्ट्राच्या प्रादेशिक विभागामध्ये ५ जिल्हे पुढील प्रमाणे येतात: पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
महाराष्ट्र प्रादेशिक विभाग नकाशा
#महाराष्ट्र_प्रादेशिक_विभाग_नकाशा
— informer Guru (@theinformerguru) November 6, 2021
अधिक माहिती साठी :- https://t.co/kdcVo4aG9K
.
..#प्रादेशिक_विभाग_किती
प्रादेशिक विभाग महाराष्ट्र#Maharashtra_Pradeshik_Vibhag_Map#informerguru pic.twitter.com/zFdzhTNwkv
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग नकाशा PDF डाउनलोड करा.
Maharashtra Pradeshik Vhibhag Map PDF
पुढील पोस्ट तुम्हाला नक्की आवडेल :-
महाराष्ट्राचे मराठी जनरल नॉलेज
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती व कोणते आहेत? हि माहिती तुम्हाला कशी वाटली? वरील माहिती ऑनलाईन शोधून लिहिण्यात आलेली आहे या मध्ये काही चुकीचे असल्यास आम्हाला insta@theinformerguru इंस्टाग्राम वर किंवा कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग हि माहिती आपल्या जवळच्या मित्र आणि मैत्रीणींमध्ये नक्की शेयर करा.
1 Comments
Good information
ReplyDelete