आधार कार्ड Expire होत असतं का? कसे चेक करावे बरं...

आधार कार्ड Expire होत असतं का? (does aadhaar expire in marathi) : दररोजच्या जीवनात आधार कार्ड खूप कामाचे आहे, आधार कार्ड ला बघून तुमच्या डोक्यात कधी ना कधी विचार आलाच असेल आधार कार्ड Expire म्हणजेच अवैध होत असतं का? या पोस्ट मध्ये आपण याबद्दल माहिती जाणून घेऊया.



जसे आपले ड्रायविंग लाइसन्स ची एक्स्पायरी डेट असते तशी आधार कार्डची कोणतीही Expire Date नसते. पण 

  • लहान बाळाचे आधार कार्ड हे फक्त ५ वर्षापर्यंत वैध (Validate) असते. नंतर जेव्हा बाळाचे ५ वर्ष पूर्ण होते तेव्हा त्याचे आधार अपडेट न केल्यास ते बाळाचे आधार कार्ड अवैध ठरते.
  • तसेच जर आपण ५ ते १० वर्ष आधार बायोमेट्रिक अपडेट नाही केले तरी आपले आधार कार्ड inactive होऊन जाते.

आधार कार्ड Active आहे कि Inactive असे चेक करा 
  • myaadhaar.uidai.gov.in या myAadhaar पोर्टल या वेबसाइट वर जायचे.
  • Verify Aadhaar या बटन वर क्लिक करा.
  • १२ अंकी आधार नंबर आणि कॅप्चा भरा.
  • Procced and Verify Aadhaar या बटन वर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर तुमच्या तुमच्या आधार चे स्टेटस दिसेल.
हि प्रोसेस केल्या नंतर जर तुमचे आधार Active असेल तर Aadhaar Verification Completed असे लिहून येईल. आणि आधार कार्ड inactive असेल तर Aadhar is inactive असे दिसेल व Biomatric Update किंवा aadhar Update करा असा मॅसेज दिसेल. असा मॅसेज दिसला तर जवळील आधार सेंटर वर जाऊन तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यावे लागेल.

Post a Comment

0 Comments