Job card information in marathi | Job card kase kadhave | Job Card Mhanje Kay? जॉब कार्ड म्हणजे काय? कसे आणि कोणाकडून काढावे? जॉब कार्ड ऑनलाइन काढू शकतो का? जॉब कार्ड PDF फॉर्म डाउनलोड । फायदे / महत्व । विद्यार्थी जॉब कार्ड बनवू शकतात का?
जॉब कार्ड म्हणजे काय?
जॉब कार्ड हे असे असे एक कार्ड आहे जे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत केंद्र शासनाकडून आपल्या सारख्या सामान्य जनतेला व शेतकऱ्यांना पुरविले जाते.
- जॉब कार्ड हे केंद्रशासनाचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून ओळखले जाते.
- आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट व राशन कार्ड सारखे महत्व जॉब कार्डला मिळालेले आहे.
नोट : शासकीय कर्मचारी सोडून सर्वसामान्य जनता व शेतकरी जॉबकार्ड बनवू शकता.
जॉब कार्ड कसे डाऊनलोड करायचे?
- जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी : येथे क्लिक करा
- लिंक वर क्लिक करा आणि State, District, Block, Panchayat इत्यादी माहिती सेलेक्ट करा.
- R1. Job Card/ Registration या मध्ये 4 नंबर चे ऑप्शन Job Card/Employment Register सिलेक्ट करा.
- तुमच्या समोर पूर्ण गावातील लोकांची जॉब कार्ड यादी दिसेल.
- नावासमोर जॉब कार्ड नंबर येईल त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे जॉब कार्ड बघू शकता.
- मोबाईल मध्ये बघत असाल तर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा लॅपटॉप/कॉम्प्युटर वर बघत असाल तर प्रिंट/PDF घेऊ शकता.
जॉब कार्ड चा वापर कुठे होतो?
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड चा वापर करण्यात येतो.
जसे कि, सरकारी योजने अंतर्गत
- घरकुल अनुदानासाठी
- गाई-गोठा अनुदान घेण्यासाठी
- शेळी पालन अनुदानासाठी
- कुक्कुट पालन अनुदानासाठी
- शौचालयाचे १२००० रु अनुदानासाठी
- विहिरीच्या अनुदानासाठी
विद्यार्थी जॉब कार्ड बनवू शकतात का?
विद्यार्थी मित्रांनो तुमचे जॉब कार्ड काढायचे असेल तर तुमचे वय १८ ते ६५ दरम्यान असावे. १८ वर्षापेक्षा कमी आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वय असल्यास तुम्ही पात्र ठरू शकत नाही.
जॉब कार्ड कसे आणि कोणाकडून काढावे?
मित्रांनो जॉब कार्ड काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जावे लागेल तिथे आपले सरकार सेवा केंद्र चालक असतील त्यांच्या काढू शकता. ग्रामपंचायत चे संगणक परिचालक (कॉम्पुटर ऑपरेटर) यांच्या कडे जॉब कार्ड बद्दल माहिती न मिळाल्यास ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी रोजगार हमीच्या डिपार्टमेंट मध्ये जाऊन हे जॉब कार्ड बनवू शकता.
जॉब कार्ड PDF फॉर्म डाउनलोड
job card form marathi pdf । job card form maharashtra । job card form 202२
job card form 1 pdf download । new job card application form 202२ pdf download
जॉब कार्ड मध्ये नाव नोंदणी साठी जॉब कार्ड फॉर्म खूप आवश्यक आहे. Job Card PDF Download करून आपली स्वतः ची व आपल्या परिवाराची माहिती भरून ग्रामपंचायत मध्ये जमा करणे.
job card vihit namuna arj marathi
जॉब कार्ड चे फायदे / महत्व ?
- जॉब कार्ड हे केंद्रशासनाचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा म्हणून ओळखले जाते.
- आधार, पॅन कार्ड, पासपोर्ट व राशन कार्ड सारखे महत्व जॉब कार्डला मिळालेले आहे.
जॉब कार्ड साठी स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतो का?
मित्रांनो आपण जॉबकार्ड साठी स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकत नाही कारण Job Card Registration साठी पाहिजे असलेला User ID आणि pasword प्रशासनाकडे म्हणजेच ग्रामपंचायत अधिकारी कडे असतो. त्यामुळे आपण स्वतः online Job Card साठी Apply करू शकत नाही. पण जर तुमचे यापूर्वी जॉब कार्ड रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि आपल्याला जॉब कार्ड चा फायदा घ्यायचा असेल तर narega.nic.in या website वरून तुम्ही जॉब कार्ड काढून शकता.
सर्व सामान्य आणि शेतकरी मित्रांनो भविष्यातील विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी जॉब कार्ड काढून स्वतः जवळ ठेवू शकता.
जॉब कार्ड बद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला मिळाली असेल तर इतरांना सुद्धा जॉब कार्ड ची माहिती शेयर करा. अश्याच ननवीन अपडेट साठी आम्हाला कॉमेंट करा आणि आमच्या युट्युब चॅनेल ला सब्सक्राइब करा.
0 Comments