मित्रानो तुमची दहावी झाली आहे आणि दहावी नंतर काय करायचे? (Dahavi Nantar Kay Karave Marathi) हा प्रश्न तुम्हाला तुमच्या मनात व डोक्यात आला असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्ट मध्ये तुम्हाला दहावी नंतर काय करावे या बद्दल सर्व माहिती मिळणार आहे.
मित्र आणि मैत्रिणींनो इयत्ता दहावी नंतर योग्य तो कोर्स निवडणे आवश्यक आहे कारण तुम्ही कोणता कोर्स निवडणार यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.
दहावी नंतर योग्य कोर्स निवडणे खूप महत्वाचे आहे कारण त्यावर तुमचे करिअर अवलंबून असते. आम्ही या पोस्ट मध्ये १०वी नंतर करता येणार कोर्स/पर्याय तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्हाला दहावी नंतर काय करायचे तो योग्य तो पर्याय निवडून पुढील भविष्यासाठी वाटचाल करायची आहे किंवा तुमच्या साठी काय योग्य आहे ते मार्गदर्शन तुमच्या ओळखीच्या करिअर मार्गदर्शनाकडून माहिती करून घ्यावे.
दहावी नंतर काय करावे?
Dahavi Nantar Kay Karave in Marathi
दहावी नंतर कोण-कोणते पर्याय असतात ?
- दहावी नंतर ११वी-१२वी करू शकता.
- ११वी-१२वी मध्ये तुम्ही विज्ञान, वाणिज्य, कला इत्यादी मध्ये प्रवेश घेऊ शकता
- तसेच दहावी नंतर तुम्ही डिप्लोमा, ITI व काही कोर्सेस करू शकता.
दहावी नंतर सायन्स म्हणजेच विज्ञान
- तुम्ही ११वी सायन्स मध्ये PCM हा विषय निवडाल तर तुम्ही बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर इंजिनियरिंग व आर्किटेक्चरचे कोर्स करू शकता किंवा दुसरे बरेचशे कोर्सेस करू शकता.
- तुम्ही ११वी सायन्स मध्ये PCB हा विषय निवडाल तर तुम्ही बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर MBBS, नर्सिंग सारखे कोर्स करू शकतात.
दहावी नंतर वाणिज्य म्हणजेच कॉमर्स
- दहावी नंतर ११ वी मध्ये तुम्ही वाणिज्य (कॉमर्स) स्ट्रीम निवडाल तर तुम्ही बारावी शिक्षण नंतर BBA, B.Com सारखे कोर्स करू शकता.
दहावी नंतर कला म्हणजेच आर्टस्
- दहावी नंतर ११ वी मध्ये कला(आर्टस्) स्ट्रीम निवडाल तर तुम्ही तुमची बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर BA, BFA, BBA सारखे कोर्स करू शकता.
दहावी नंतर डिप्लोमा
- डिप्लोमा इन कॉम्पुटर इंजिनीरिंग
- डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनीरिंग
- डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग
- डिप्लोमा इन सिविल इंजिनीरिंग
- डिप्लोमा इन मरीन इंजिनीरिंग
- डिप्लोमा इन हॉटेल मानजमेंट
- डिप्लोमा इन गारमेंट टेकनॉलॉजि
- डिप्लोमा इन आर्ट टीचिंग
- डिप्लोमा इन कमर्सियल आर्ट
दहावी नंतर ITI कोर्स करू शकता
- डिझेल मेकॅनिक
- पंप ऑपरेटर
- फिटर
- हेअल्थ अँड स्किन केर
- वायरमन
- कार्पेन्टर
- प्लंबर
0 Comments